ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ नारायणन यांचे निधन   

कोझिकोडे :  केळमधील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे माजी अध्यक्ष एमजीएस नारायणन यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी, असा परिवार आहे. 
 
देशातील नामांकित इतिहासतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती कालिकत विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख आणि इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. इतिहास संशोधनात नारायणन यांनी मोलाचे योगदान दिले, अशा शब्दांत राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. दुर्मिळ हस्तलिखिते गोळा करणे, इतिहासाचे पुन्हा लेखन करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. इतिहासाचे संशोधन करताना पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी कागदपत्रांचा सर्वकष अभ्यास केला. वैज्ञानिकदृष्ट्या ती तपासली, असे शोकसंदेशात मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.

Related Articles